
दिनांक 9 जून 2025 रोजी क्रांतीसुर्य महामानव धरती आबा बिरसा मुंडा यांच्या स्मृति दिना निमित्त यवतमाळ येथे बिरसा क्रांती दला तर्फे आदिवासी सन्मान परिषद पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान बिरसा क्रांती दलाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी साहेब, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून किनवट चे सन्माननीय आमदार आदिवासी नेते भीमराव केराम, तर प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी भूषविले.
यावेळी विचार पिठावर बिरसा क्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डी. बी. अंबुरे, विदर्भ अध्यक्ष, महिला फोरम प्रदेश अध्यक्ष गिरिजा उईके, बिरसा व्हॉलिंटीयर फार्सचे राज्य प्रमुख नारायण पिलवंड, बिरसा क्रांती दलाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय मडावी, राज्य संघटक वी.डी. कोवे, विदर्भ प्रदेशाध्यक्ष मारोती उईके, उपाध्यक्ष उत्तमराव मोडक, पूर्व विदर्भ उपाध्यक्ष शामराव उईके, पश्चिम विदर्भ प्रमुख संतोष ठाकरे, उपाध्यक्ष रमेश भिसणकर, पश्चिम विदर्भ संघटक शरद चांदेकर, विदर्भ युवक अध्यक्ष अर्जुन युवनाते, पश्चिम विदर्भ सचिव कैलास बोके, सचिव राजेश मस्के, पूर्व विदर्भ सचिव अंकुश धुर्वे, अमरावती जिल्हाध्यक्ष प्रा. कमलनारायण उईके, यवतमाळ अध्यक्ष नारायण पेंदोर, महिला फोरम अध्यक्ष पुष्पा ससाने, अकोला अध्यक्ष सुधाकर पांडे, वाशिम अध्यक्ष मोहन गिरे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष भगवान कोकाटे, वर्धा अध्यक्ष हरिदास टेकाम, नागपूर जिल्हाध्यक्ष सागर कोकर्डे, जिल्हाध्यक्ष गोंदिया धनवंत कोवे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष धनराज कोवे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष खुशाल गेडाम, गोंदिया जिल्हाध्यक्ष चित्तरंजन फुसाम, कोकण विभाग अध्यक्ष तुकाराम जुमनाके, बुलढाणा महिला फोरम अध्यक्ष ज्योती करवते, अकोला महिला फोरम अध्यक्ष कार्तिक ठाकरे, अमरावती महिला फॉर्म अध्यक्ष नलिनी सिडाम, वाशिम महिला फॉर्म अध्यक्ष कांचन चौधरी, वर्धा महिला पुरम अध्यक्ष निर्मला कर्णाके, चंद्रपूर महिला फोरम अध्यक्ष निर्मला मेश्राम, गडचिरोली अध्यक्ष पौर्णिमा इस्टाम, गोंदिया अध्यक्ष संगीता फुसाम व संघटनेचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मडावी यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरावती जिल्हाध्यक्ष प्रा. कमलनारायण उईके यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रेरणा गीताने तर कार्यक्रमाचा शेवट क्रांती गीताने करण्यात आला.