यवतमाळ:जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनी ९ जून 2025 रोजी बिरसा क्रांती दलाच्या तर्फे चौथी आदिवासी सन्मान परिषदेचे सेंट्रल सेलिब्रेशन हॉल मेडिकल चौक यवतमाळ येथे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला उद्घाटक म्हणून (अन्न व औषध प्रशासन मंत्री) नामदार नरहरी झिरवाळ, हे उद्घाटक म्हणून लाभणार आहेत . तर प्रमुख अतिथी म्हणून किनवट चे लोकप्रिय आमदार मा. भीमरावजी केराम ,यवतमाळचे लोकप्रिय आमदार मा .बाळासाहेब मांगुळकर, या परिषदेचे अध्यक्ष बिरसा क्रांती दलाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. दशरथ मडावी हे राहणार आहेत.
या परिषदेला राज्याध्यक्ष डी. बी. अंबुरे, राज्याध्यक्ष महिला फोरम मा. गिरीजाताई उईके,( राज्याध्यक्ष बी. व्ही. एफ.) मा. नारायण पिलवड,राज्य उपाध्यक्ष,संजय मडावी,राज्य संघटक व्ही.डी. कोवे,विदर्भ प्रदेश आध्यक्ष मारोती उईके,उपाध्यक्ष उत्तमराव मोडक,पूर्व विदर्भ प्रमुख संतोष ठाकरे, पश्चिम विदर्भ प्रमुख,शामराव उईके,उपाध्यक्ष रमेश भिसनकर,राहणार आहेत. या कार्यक्रमाचे संयोजक शरद चांदेकर अर्जुन युनाते ,कैलास बोके ,राजेश मस्के ,अंकुश धुर्वे ,करणार आहेत. तर कार्यक्रमाचे आयोजन विदर्भातील सर्व अध्यक्ष नारायण पेंदोर, पुष्पा ससाने, सुधाकर पांडे ,कमल नारायण उईके ,मोहन गिरे, भगवानराव कोकाटे ,सागर कोकारडे,धनवंत कोवे, धनराज कोवे, विशाल गेडाम ,चित्तरंजन पुसाम, तुकाराम जुमनाके हे आहेत. महिला फोरम अध्यक्ष, ज्योती करवते , कांचन चौधरी, निर्मला करनाके, निर्मला मेश्राम ,पौर्णिमा इस्टाम, संगीता पुसाम एम्प्लॉईज फोरम अध्यक्ष संजय मिराशे, सुरेश खुळे, पवन सिंग तुमडाम, राजेश ससाणे , संभाजी खुळे,डॉक्टर अर्जुन कोडापे, धनराज मेश्राम ,दिलीप शेडमाके रोशन पेंद्राम, युवक फोरम अध्यक्ष शुभम चांदेकर, मंगेश लोखंडे , विशाल रामरामे,आहेत.
या परिषदेच्या यशस्वी साठी बिरसा क्रांती दलाचे सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत. तरी सर्व आदिवासी समाज बांधवांनी या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित करण्याचे आवाहन बिरसा क्रांती दलाचे राज्याध्यक्ष डी.बी अंबुरे यांनी केले आहे.
