सामाजिक परिवर्तनाची लढाई शेवटच्या श्वासापर्यंत लढणार – डी .बी . अंबुरे

आर्णी:स्वातंत्रपूर्व काळापासून आदिवासी समाजाची परिस्थिती फार बिकट होती. त्यांचा आर्थिक, सामाजिक ,शैक्षणिक स्तर अत्यंत हलाखिचा होता. स्वातंत्र्यानंतर संविधानामुळे आदिवासी समाजाचा स्तर उंचवायला लागला .त्याकरिता अनेक आदिवासी समाज सुधारकांनी आपले बलिदान दिले. त्यांनी केलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या लढाईमुळेच हे शक्य झालेले आहे. परंतु इथल्या व्यवस्थेला आदिवासींचा विकास नको आहे. डोळ्यात गेलेल्या कचऱ्याप्रमाणे तो खूपतो आहे, म्हणून वेगवेगळ्या पातळीवरती आदिवासींचा विकास थांबवण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत .आदिवासींचा विकास हा महापुरुषांच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढाईतुनच शक्य आहे.म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत सामाजिक परिवर्तनाची लढाई लढणार असे प्रतिपादन माननीय डी.बी अंबुरे ,राज्याध्यक्ष, बिरसा क्रांती दल यांनी तालुकास्तरीय बैठकीमध्ये केले. बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून नारायण पिलवंड ,राज्याध्यक्ष ,बी.व्ही. एफ. संजय मडावी,राज्य उपाध्यक्ष ,शरद चांदेकर संघटक ,अमरावती विभाग,विष्णु कोवे,जिल्हाध्यक्ष,पुष्पाताई ससाने, अध्यक्ष,महिला फोरम ,नागोराव गेडाम,जिल्हा महासचिव,नारायण पेंदोर,जिल्हा उपाध्यक्ष,निळकंठ मिरासे ,जिल्हा उपाध्यक्ष , राजेश ससाने,जिल्हाध्यक्ष, वाशिम, रामेश्वर ढगे ,जिल्हा संघटक,शंकर पखमोडे,निलेश उकंडे उपस्थित होते.बैठकीला तालुक्यातील विविध गावातील पदाधिकारी उपस्थित होते. त्यात राजु डकरे,प्रतिक कुळसंगे, इंगळे ,भोजराज दुम्हारे,लक्ष्मण सोयाम,रुषिकेश मडपाची,पांडूरंग देवकर, भारत भुसेवाड, लक्ष्मण भस्मे, महादेव उईके,महादेव गेडाम,माधव नेवारे,शंकर परचाके,पवन पुसनाके,राम हांडे,विक्रम लसवंते उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन विष्णुजी लसवंते ,अध्यक्ष,बिरसा क्रांती दल,आर्णि यांनी तर आभार प्रविण धुर्वे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *