बिरसा क्रांती दल एक कॅडर बेस संघटन !

डी.बी.अंबुरे (राज्य उपाध्यक्ष बिरसा क्रांती दल)

बिरसा क्रांती दल या संघटनेचा जन्म 15 नोव्हेंबर 2015 रोजी झाला.या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.दशरथ मडावी साहेब आहेत.मडावी साहेबांच नाव संपूर्ण
महाराष्टला परिचत आहे.ते फुले शाहू अांबेडकरी विचाराचे प्रचारक आहेत.गेल्या चाळीस वर्षापासुन ते समाज प्रबोधनाचे काम करित अाहे. त्याच बरोबर एक कवी, लेखक, नाटकार, विचारवंत ,प्रबोधनकार व कुशल संघटक म्हणून त्यांची ख्याती अाहे.

          या देशात सात टक्के अादिवासी समाज अाहे.महाराष्टात 45 जमाती आहे.हा समाज अजुनही उपेक्षित अाहे.स्वातंत्र्याच्या 72 वर्षानंतर ही अादिवासी समाज समस्सा ग्रस्त अाहे.अादिवासी समाजाला मुख्यप्रवाहात अाणायचे असेल तर समाजातील जानकार, बुध्दीजीवी लोकांनीच पुढे येने अावश्यक.  खास अादिवासी समाजाचे कॅडर बेस संघटन समाजात निर्मान व्हावे अशी माझी मडावी  साहेबा सोबत चर्चा झाली.त्या चर्चेतुनच बिरसा क्रांती दल या संघटनेचा जन्म झाला.

           बिरसा क्रांती दल या संघटनेचा मुलभूत पाया हा अादिवासी समाज अाहे.अनुसूचीत जमातीच्या यादीत  ज्या ज्या जमातीचा  समावेश केला अाहे अश्या  सर्व जमाती या संघटनेचा अाधार अाहे.
    बिरसा क्रांती दल हेच नाव का ठेवले ? हा अनेकांना प्रश्न पडला असेल.तर याचे साधे उत्तर असे की,सर्व अादिवासी समुदायात क्रांतीवीर बिरसा  मूंडा यांना अादिवासीचा क्रांतीकारी नेता म्हणून स्विकारले अाहे. भारतीय समाज व्यवस्थेत अादिवासी समाजाचे प्रतिक म्हणून बिरसा मुंडा उदयास अाले अाहे.सर्व अादिवासी जमातीला एकत्र करण्यासाठी बिरसा हेच नाव उचीत वाटले.म्हणून बिरसा हे नाव संघटनेला दिले.

          क्रांती हे शब्द अापल्या सर्वांना परिचीत अाहे.क्रांती  संविधानामुळे अापल्या अादिवासीस माजातील सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टीने क्रांती शब्द अत्यंत समर्पक  अाहे. म्हणून क्रांती शब्दाची निवड अापण केली. दल हे शब्द एक सैनिकी शिस्त संघटन व अन्यायाच्या विरोधात अाक्रमक पणे लढाई करण्याच्या कृतीचा पर्यायी शब्द म्हणून तो अापण वापरला अाहे. अादिवासी समाजात एक शिस्तबद्ब संघटन निर्माण करण्याच्या दृष्टीने बिरसा  क्रांती दलाची निर्मिती 15 नोव्हेंबर 2015 येथे करण्यात अाली.

         अादिवासी  समाजातील सजग युवक व शिक्षित तथा जागृत  कर्मचारी यांना संघटीत कसण्याचा ऊद्देश हाच अाहे की या देशाचे मुळ रहीवासी ,अादिवासी या नावाने ओखले जाणारे सर्व समुदाय सर्व जमातींना, धर्मांध , उच्चवर्णीय लोकांच्या त्यांनी निर्माण केलेल्या शोषण व्यवस्थेमधुन मुक्ती करणे.या मध्ये शिक्षित कर्मचारी वर्गाची भूमिका अत्यंत महत्तवाची अाहे.म्हणून कर्मचार्यांना BEF च्या माध्यमातुन एकत्र करण्याचा  निर्णय घेण्यात अाला अाहे.त्याचे कारण असे की ,भारतीय संविधानामुळे अापल्या अादिवासीस समाजातील शिक्षित  लोक अधिक लाभान्वित झाले अाहे.अारक्षणामुळे विविध खात्यात अापली माणसं अादिवासी समाजाची असल्यामुळेच त्यांना नौकरी मिळाली.जर ती केवळ शिक्षित असती अाणि अादिवासी जमातीची नसती तर त्यांना नोकरी मिळाली असती का ?हा प्रश्न अंतरंगातुन समजुन घेण्याची गरज अाहे.समाजातील ज्या घटकांना अारक्षणाचा लाभ झाला त्याचे हे कर्तव्य अाहे की , समाजातील वंचित राहीलेला घटक,त्याचे होत असलेले शोषण ,त्यांचेवर झालेला अन्याय या सर्व बाबींचा विचार करुन यातुन त्यांची मुक्तता करणे हे शिक्षित माणसाचे परम कर्तव्य अाहे.

             अापल्या भाऊबंधाचा विचार अापण करणार नाही तर मग कोण करेल ?
सामाजिक  बांधलकिची जाण ठेऊन समाजातील संवेदन शिल युवकांचे बिरसा क्रांती दल अाणि कर्तव्य दक्ष कर्मचार्यांचे BEF या संघटणे चा उदय  झाला अाहे.

बिरसा क्रांती दल अाणि बिरसा एम्पोलाइज फोरम या झेंड्याखाली अादिवासी समाजातील 45 जमातीतील परिवर्तणशील युवक व जागरुक शिक्षित कर्मचारी यांना संघटीत करण्याचा निर्णय घेतला अाहे.समाजातील अश्या सजग घटकांना संघटीत करण्याची धारणा खालील वाक्यामुळे अधिक दृढ होते.

                         ‘ स्वावलंबनाचा स्विकार ही सर्वश्रेष्ठ गोष्ट असते.अाणि अात्मसन्मानाचे अांदोलन स्वावलंबनाशिवाय चालुच शकत नाही.’ भारतीय समाज व्यवस्थेत सर्वात शोषित ,पिडीत समाज हा अादिवासी समाज अाहे.अाणि म्हणूनच या ब्राम्हणी व्यवस्थेचा जो समाज अधिक शिकार झाला अाहे.त्या समाजाने अापल्या या झालेल्या दुर्दशेत सुधालणा करण्यासाठी अाणि अापल्या अाणि अापल्या सोबत होत असलेल्या अन्यायाचा समूळ नाश करण्यासाठी स्वत:च स्वत:ला एका सुत्रात बांधून घेतले पाहीजे.

                          अापले संविधान या सत्याचा स्विकार करते अाहे की,अादिवासी समाजावर अनंत काळापासुन अन्याय होत अाहे.या एेतिहासिक सत्याला लक्षात घेऊन अापल्या संविधानात अादिवासी समुदायाचे अधिकार व हित सुरक्षित ठेवण्यासाठी काही प्रावधान केले अाहे.तरी पण सरकार यावर अमल करेल की नाही. हे सांगता येत  नाही.त्या मुळे अादिवासी समाजाला अापल्या हिताची व अधिकारांची रक्षा करण्यास स्वत: संघटीत होणे अनिवार्य अाहे.या अत्यंत महत्तवाच्या कामासाठी अारक्षणामुळे लाभांन्वीत झालेला अादिवासी समाजातील कर्मचारी  हा वर्ग अत्यंत उपयुक्त  अाहे.

  एेतिहासिक पार्श्ववभूमी:-

                    सामाजिक ,अार्थिक शोषणाच्या विरुध्द भारताच्या अनेक प्रांतात अादिवासी जमातींची त्या त्या भूभागात  अांदोलने झाली. ही सगळी अांदोलन अात्मसन्माची होती.तत्कालीन लढ्याच्या पार्श्वभूमिवर  अादिवासी जमातीकडे  अाधूनिक हत्यारं नव्हती,परंतु स्वाभिमानी बारुद सर्वांच्याच उरात धगधगत होती.म्हणून परकिय अाक्रमणांच्या अाणि प्रसंगी स्वदेशी शोषकांच्या विरोधात अादिवासी अाक्रमकपणे उभा राहीला.प्राचिन कालखंड सोडला तरीही 1778 ते 1945 पर्यंतचा  या  अादिवासी लढ्याचा इतिहास समजुन घ्यावा लागतो.

               तत्कालीन कालखंडात झालेली अादिवासींचे लढे कदाचीत सिमित भागात ,सिमित प्रश्नावरही असेल परंतु प्रत्येक अादिवासींचा लढा हा स्वदेश, स्वाभीमान या मुल्यांनी ओतप्रत भरलेला होता. 1885 च्या दरम्यान या सर्व अादिवासी समाजाच्या लढ्यांना एका सूत्रात बांधून बहुअायामी लढा उभारण्याचे काम बिरसा मुंडानी केले. यांच्याच अासपास  किंवा मागेपुढे ज्यांच्या अांदोलनामुळे अादिवासी समाजात चेतना निमार्ण झाली त्यातील काही अादिवासी नेते,क्रांती कारक राघोजी भांगरा ,तंट्या मामा ,राणी दुर्गावती मडावी,बाबुराव शेडमाके, नाग्या कातकरी सिंधू संथाल तिलका माझी खाजा नाईक राणी गायडिन्लू नारायणसिंह उईके बाबुराव मडावी शामदादा कोलाम गोविंदराव बुचके या क्रांती कारकांचा अाणि समाज धुरीणांचा संघर्ष समाजाला पोषकच ठरला अाहे. हा संघर्ष अाजच्या लोकशाही मार्गाने अापल्याला पुढे नेता अाला पाहीजे.अाजच्या संदर्भात लोकशाही पध्दतीने या संघर्षाला कोण पूढे नेऊ शकतो ? तर तो घटक म्हणजे समाजातील शिक्षीत वर्ग ! परंतु शिक्षीत वर्गच जर मेल्यासारखा वागायला लागला तर या मेलेल्या समाजाला कोण जागवेल ? कोण उभा करेल ?कोण यांना शोषण मुक्त करेल ? या प्रश्नांचा अाज सर्वांनीच विचार करण्याची गरज अाहे.

         सामाजिक उपयोगासाठी प्रयत्न:

                     अामच्या सामाजिक उत्थान व स्वातंत्र्यासाठी लढणार्या नेत्यामुळे अाणि डाॅ.बाबासाहेब अांबेडकर व मा.जयपालसिंग मुंडा यांच्या अथक प्रयत्नामुळे अादिवासी समाजाचे हित व अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय संविधानात अनेक गोष्टींचा…

 संघनेची रचना:-

समजदार अाणि परिपक्कव पणे विचार करणारी लोकच अापल्या अटीनुसार किंवा समाजाच्या गरजेनुसार अापले संघटण निर्माण करतात या संघटणेचे प्रमुख तीन अाधार तत्व असेल.
1. मास बेस . 2.ब्राडबेस.3.कँडरबेस.   हे तीन अाधारतत्व समजुन घेणे महत्तवाचे अाहे.

1.मास बेस:

                 मास बेस (जनाधार) अावश्यकतेनुसार  संघटनेचे रुप अाणि अाकार हा विशाल असला पाहीजे.त्यात अादिवासी बहुल प्रत्येक गावातील माणूस जोडला गेला पाहीजे.ज्याच्यासाठी हे संघटण अापण उभे करतोअाहे त्या माणसांना हे संघटण  अापले वाटले पाहीजे.त्यांच्या समस्सा घेऊन संघटनेने लढा उभारला पाहीजे.त्या मुळे संघटनेला जनाधार मिळेल.जनाधार मिळाला तर संघटन चालवायला अधिक सोपे जाते.हे संघटण विशिष्ट लोक ,विशिष्ट प्रश्न विशीष्ट  भूमाग , सिमित असता कामा नये. परंतु शोषितांचा लढा लढतांना शोषकांची बाजु घेणार नाही याचीही दक्षता घेणे गरजेचे अाहे.

 2.ब्राॅडबेस (विस्तारीत अाकार )

 या संघटणेची बांधणी करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहीजे ती म्हणजे संघटन संपूर्ण अादिवासी  समाजाचे संघटण अाहे.अाज महाराष्र्टात जेवढ्या जमाती अाहे.त्या सर्व जमाती या मध्ये समाविष्ट अाहेत.त्या जिल्हात ज्या अादिवासींच्या जमाती राहतात त्या जिल्हात त्या सर्व जमाती संघटनेत सहभागी झाल्या पाहीजे असे संघटकांनी प्रयत्न  करायचे अाहे. त्याच बरोबर या संघटनेचा विस्तार करतांना अादिवासी बहूल जिल्हातील प्रत्येक गावात दहा कार्यकत्यांची निर्मिती करणे अावश्यक अाहे. एका तालुक्यात किमान शंभर गावात अापले संघटण निर्माण झाले पाहीजे म्हणजे एका तालुक्यात एक हजार कार्यकर्ते निर्माण होतील. या संख्येच्या अाधारावरती अापल्याला अादिवासी समाजाच्या अात्मसन्मानाचे कोणतेही अांदोलन उभे करता येइल.

  3.कॅडरबेस(प्रशिक्षीत कार्यकर्ता )

         संघटनेला जनाधार लाभला किंवा ग्राम पातळी पर्यंत विस्तार केला तरीही संघटनेला प्रभावी पणे काम करु शकत नाही.त्या साठी प्रशिक्षीत कार्यकत्यांची (कॅडर)  अावश्यकता असते.एक प्रशिॅक्षीत कार्यकर्ता हजारो लोकांना योग्य मार्गाने नेऊ शकतो. कोणत्या प्रसंगी कोणता निर्णय घेतला पाहीजे किंवा कोणत्या कार्यकत्याची किती क्षमता अाहे,अांदोलनाची वैचारीक भूमिका स्पष्टपणे जनतेसमोर मांडणे या सर्व गुणांचा समुच्चय प्रशिक्षीत कार्यकत्यामध्ये असतो. शिस्तप्रियता, अध्यावत ज्ञानठेवणे,प्रभावी अाकलनशक्ती,योग्य अभिव्यक्ती,संघटन कौशल्य ,निर्णय क्षमता,कल्पक नियोजन अाणि सामाजिक बांधिलकी या गुणांसहीत तो परिपूर्ण असतो.कोणत्याही संघटनेच्या सदस्य संख्यापैकी 5%हे प्रशिक्षीत कार्यकत्य असणे अावश्यक अाहे. अशा कॅडरच्या अाधारावर संघटना योग्य पद्धतीने चालत असते.व उद्देशापासुन भरकटत नाही. या तीन अाधारतत्वाच्या अनुषंगानेही संघटणा निर्माण करावयाची अाहे.

मा.दशरथ मडावी (संस्थापक अध्यक्ष बिरसाक्रांती दल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *