जागतिक आदिवासी दिन आदिवासी हक्काचा जाहीरनामा.

डी.बी.अंबुरे
दारव्हा वार्ताहर:


नुकतीच दारव्हा येथे बिरसा क्रांती दलाच्या वतीने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याबाबत शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बिरसा क्रांती दलाचे राज्य अध्यक्ष डी.बी अंबुरे यांनी बिरसा क्रांती दल संपूर्ण महाराष्ट्रात जागतिक आदिवासी दिन साजरा करीत आहे, त्याचाच एक भाग म्हणून आपण जागतिक आदिवासी दिन का साजरा केला पाहिजे यासाठी त्यांनी बिरसा क्रांती दलाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना जागतिक दिनाविषयी माहिती दिली ते यावेळी म्हणाले की,
संयुक्त राष्ट्रसंघाने 1993 हे आदिवासी वर्ष जाहीर केले .व 9 ऑगस्ट 1945 या दिवशी जागतिक आदिवासी दिन घोषित केला.(इंटरनॅशनल डे ऑफ इंडिजिनस पीपल) दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जगाचे प्रचंड नुकसान झाले. जगातील विद्वान लोकांना कळाले की जगातील प्रत्येक राष्ट्राला स्वतंत्र देणे हा त्याचा हक्क आहे. त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची गरज आहे. ही जाणीव जगाला झाली . तसेच दुसऱ्या महायुद्धात वित्तहानी, मनुष्य हानी मोठ्या प्रमाणात झाली .तर त्याच वेळेस मात्र आदिवासी समुदाय जंगलांमध्ये वास्तव्य करून राहत होता. जंगल, संपत्ती व निसर्गाचे संरक्षण करत होता .परंतु विकासापासून कोसो दूर होता. मुख्य प्रवाहात तो आला नव्हता. कारण तो इतरांच्या हक्क व अधिकार हिरावून घेत नव्हता. आदिवासी संस्कृती मध्ये एकमेकांचे स्वातंत्र्य ,अधिकार, मैत्री व समन्वय यांचा प्रथमपासूनच प्राधान्य दिले गेले. 24 ऑक्टोबर 1945 या दिवशी संयुक्त राष्ट्र संघ अस्तित्वात आले. जगातील विविध देशात साधारणपणे जंगलात वास्तव्य करून राहणाऱ्या (मूळ निवासी ) लोकांनी जंगलाचे व पर्यावरणाचे रक्षण व संरक्षण केले. निसर्गाचे संरक्षण करण्याचे काम आदिवासींनी मोठ्या प्रमाणात केले. परंतु आदिवासी समाज मुख्य प्रवाहात नसल्याने या आदिम जमाती शिक्षण ,आरोग्य ,रोजगार या सर्व पासून कोसो दूर राहीले. आदिवासी जमातीचे अस्तित्व मान्य करून संयुक्त राष्ट्रसंघाने 9 ऑगस्त 1994 या दिवशी जागतिक आदिवासी दिनाची घोषणा केली. हा दिवस आदिवासींच्या आत्मसन्मानाचा दिवस आहे. आपल्या पूर्वजांनी आत्मसन्मानाची आणि स्वाभिमानाची चळवळ चालवली परंतु येथील व्यवस्थेने ती सातत्याने हाणून पाडली. आदिवासी समाज हा समतावादी अस्तित्वावर विश्वास ठेवणारा समाज आहे परंतु ज्या वेळेस परंपरागत स्वतंत्रयावर आघात झाला व परंपरागत जीवनपद्धती नाश होण्याची वेळ आली, त्यावेळी आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रयत्नांना यश येऊ दिले नाही. संपूर्ण भारतात आदिवासी क्रांतिकारकांनी साधारणता ,1757 ते 1900 व 1901 ते 1945 पर्यंत आपल्या हक्क व अधिकारासाठी लढा दिला .ज्या परिसरात आदिवासी समुदाय मोठ्या संख्येने राहात होता त्या भागात अनेक आंदोलने झाली. उठाव झाले .जसे मध्ये भारतात भिल्ल क्रांतिकारकांनी 1818 ते 1858 इंदूर ते नांदूर ,ब्रहानपूर ते रामपूर . श्रीरामपूर ते सुलतानपूर या भागात सतत चाळीस वर्ष जुलमी सत्तेविरूद्ध सशस्त्र लढा दिला .आपल्या स्वातंत्र्यासाठी 11 एप्रिल 1860 रोजी अंबापानी च्या लढाईत अटक झालेल्या 57 भिल बहादुर रांनी ढोलाच्या ठेक्यावर बंदुकीच्या गोळ्याझेलून पहीला मान मिळवला. त्या वेळी स्त्रियाही मागे नव्हत्या चारशे स्त्रियांनी स्वतःला अटक करून घेतली. त्यावेळी खाजानाईक तंट्या मामा ,भागोजी भांगरे आधी आदिवासी वीरांनी मोहिमेचे नेतृत्व केले. हा लढा होता आदिवासींच्या आत्मसन्मानाचा. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक बिरसा क्रांती दलाचे राज्याचे उपाध्यक्ष डी.बी अंबुरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *