कारवाई थंडबस्त्यात – उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून झाले आठ महिने

मेडिकल प्रवेशातील बोगस आदिवासींना संरक्षण

यवतमाळ – अनुसूचीत जमातीसाठी राखीव असलेल्या जागेवर बनावट जातप्रमाणपत्र , बनावट जातवैधता प्रमाणपत्राच्या आधारे उच्च शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश मिळवायचा.हा प्रकार उघडकिस आल्यानंतर कारवाई झाली की मग न्यायालयात जायचे आणि कारवाईस तात्पुरती स्थगिती मिळवून आपले शिक्षण पूर्ण करुन पदवी घेऊन बाहेर पडायचे.
हा प्रकार कित्येक वर्षापासून या राज्यात चालू आहे.

सन २०१२-१३ ते सन २०१५-१६ ह्या चार वर्षातील मेडिकल प्रवेशातील माहिती , माहिती अधिकार कायद्या अंतर्गत बिरसा क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष सदानंद गावित (सेवानिवृत्त सहसचिव मंत्रालय मुंबई ) यांनी मिळवली आहे.

सन २०१२-१३मध्ये प्रवेश घेतलेले
करण जसराज पुरोहित , शेख मारीया शहनवाज मोहम्मद  यांनी ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , भायखळा मुंबई ,
बिपीन हवालसिंग ब्लोवडा यांनी सेंट जी.एस.वैद्यकीय महाविद्यालय परळ मुंबई येथे प्रवेश घेतला.

सन २०१३-१४ मध्ये प्रवेश घेतलेले

कादरी मोहम्मद इसरारुल हक्क, अवैस खान अली हसन खान , मोहम्मद आकिफ रेशमवाला, खान अरीबा इकरान मयुद्दीन यांनी ग्रँट शासकीय महाविद्यालय ,भायखळा मुंबई ,
फय्याजभाई अमिनभाई नंदोलिया, कु.आजमी फातीमास इस्तेयाक, यांनी लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय शिव मुंबई  ,
कु.विधी विनोद श्रीवास्तव हिने नायर रुग्णालय दंत महाविद्यालय मुंबई सेन्ट्रल ,मुंबई ,
खान अनिरवाह सरवट एहते शाम खान यांनी बायल नायर धर्मा रुग्णालय आणि टो.रा.वैद्यकीय महाविद्यालय मुंबई सेन्ट्रल ,
 जिनत परावन अस्फाक खान , सय्यद शरिक नवाज मोहम्मद वाहम तुराम यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे प्रवेश घेतला.

सन २०१४-१५ मध्ये प्रवेश घेतलेले

नुर अमन मन्सुरी अब्दुल सत्तार मन्सुरी , आयेशा अरीफ रेशमवाला यांनी ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भायखळा मुंबई येथे प्रवेश घेतला.

सन२०१५-१६ मध्ये प्रवेश घेतलेले

शेख तायबा युनुस यांनी ग्रँट शासकीय वैद्यकिय महाविद्यालय भायखळा मुंबई , यश चिराग पारेख यांनी लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय शिव मुंबई  ,  पटेल सिराज मोहम्मद यांनी  एच.बी.टी.वैद्यकीय महाविद्यालय आणि डाँ.रु.न.कुपर रुग्णालय विलेपार्ले पश्चिम मुंबई येथे , कु.देवकी जयेश गांधी हिने नायर रुग्णालय दंत महाविद्यालय मुंबई सेन्ट्रल मुंबई येथे प्रवेश घेतला.

या सर्व  १९ विद्यार्थ्यांनी मुंबई शहर ,मुंबई ,धुळे , जळगाव , बीड मधून बनावट जातप्रमाणपत्र मिळवून मेडिकल प्रवेश मिळविला.

जातवैधता प्रमाणपत्रही बनावट

करण जसराज पुरोहित , शेख मारिया शहनवाज मोहम्मद , श्री.कादरी मोहम्मद इसरारुल हक्क , श्री.अवैस खान अली हसन खान , मोहम्मद आकिफ अरीफ रेशमवाला , खान अरीबा इकरान मयुदीन , नुर अमन मन्सुरी अब्दुल सत्तार मन्सुरी , आयेशा अरीफ रेशमवाला ,शेख तायबा युनुस ,फय्याजभाई अमिनभाई नोंदोलिया , यश चिराग पारेख ,कु.विधी विनोद श्रीवास्तव, कु.देवकी जयेश गांधी ,पटेल सिराज मोहम्मद ,खान अनिरवाह सरवट एहते शाम खान ,जिनत परविन अस्फाक खान , सय्यद शरिक नवाज मोहम्मद वाहब तुराम या उमेदवारांचे जातवैधता प्रमाणपत्र अनुसूचीत जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार यांनी  दि.६/५/२०१६ रोजी दिली नसल्याची माहीती , माहीती अधिकार कायद्या अंतर्गत दिली आहे.
तसेच  कु. आजमी फातीमास इस्तेयाक , बिपीन हवासिंग ब्लोवडा यांना जातवैधता प्रमाणपत्र अनुसूचीत जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नाशिक यांनी दि.१६/१०/२०१५ रोजी  दिली नसल्याची माहीती , माहीती अधिकार कायद्याअंतर्गत दिली आहे.

त्यामुळे बिरसा क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष सदानंद गावित यांनी संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई , सचिव आदिवासी विकास विभाग यांचे कडे पत्राद्वारे रितसर या बोगस आदिवासी विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

त्याअनुषंगाने संचालक वैद्यकिय शिक्षण व संशोधन मुंबई यांनी तपासणी करुन या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले होते.

 प्रवेश रद्दच्या आदेशाविरुद्ध या विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन जानेवारी २०१७ मध्ये रिट याचिका दाखल केल्यात त्यामुळे न्यायालयाने प्रवेश रद्दच्या निर्णयास अंतरिम स्थगिती दिली. या आदेशास अनुसरुन सदर उमेदवार त्यांचे वैद्यकीय शिक्षण घेत होते.

 उच्च न्यायालय मुंबई यांनी रिट याचिका क्र.२०३१/२०१७ व इतर १४ संदर्भात  दि.१५/२/२०१८ रोजी अंतिम सुनावणी घेऊन या सर्व याचिका रद्द करून  फेटाळण्यात आल्या.

आठ महिन्यापासून कारवाई नाही.

उच्च न्यायालयाने याचिका रद्द करुन फेटाळल्या या घटनेला आठ महिने झाले.
परंतू अद्यापही या मेडिकल प्रवेशातील बोगस आदिवासींवर प्रशासनाने कारवाई केली नाही.

त्यामुळे बिरसा क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष सदानंद गावित यांनी न्यायालयाच्या निर्णयासह राज्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य सचिव , आदिवासी विकास विभागाचे सचिव , आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे , संचालक वैद्यकिय शिक्षण व संशोधन मुंबई यांचे कडे आदिवासींचे राखीव जागेवर मेडिकल प्रवेशात घुसखोरी करणाऱ्या या बोगस आदिवासींवर कठोर कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यात बनावट जातप्रमाणपत्र व जातवैधता देणारे रँकेट

गेल्या २०/२५ वर्षापासून वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशातील आदिवासींच्या शेकडों राखीव जागा बनावट जातप्रमाणपत्र , बनावट जातवैधता प्रमाणपत्राच्याआधारे बळकावून आदिवासींना त्यांच्या घटनात्मक हक्कापासून वंचित केले जात आहे. बनावट जातप्रमाणपत्र , जातवैधता मिळविल्याचे सिद्धही झाले आहेत. याचा अर्थ राज्यात बनावट जातप्रमाणपत्र , बनावट जातवैधता प्रमाणपत्र तयार करुन देणारे रँकेट अस्तित्वात असून सक्रिय आहे. राज्याच्या गृह विभागाने या रँकेटचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्याची मागणी बिरसा क्रांती दलाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *