
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा पुतळा सन्मानाने बसवावा: दशरथ मडावी
यवतमाळ: नुकतीच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची ३ जानेवारीला जयंती झाली. यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौकात दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी स्थापित करण्यात आलेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता रातोरात कटर मशीनच्या साहाय्याने हटवल्यामुळे यवतमाळ शहरात तीव्र जनक्षोभ उसळला होता .क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचे कार्य फार महान आहे .ज्यांनी स्री शिक्षणाची ज्योत पेटवून तमाम भारतीय महिलांना स्वाभिमानाच जीनं शिकवलं , त्यांच्या पुतळ्याबाबत झालेली ही कृती अत्यंत निंदनीय आणि लोक भावना दुखावणारी आहे .अशा निंदनीय कृतीचा निषेध करायचा असेल तर आदिवासींचे नवनियुक्त नगरसेवक यांनी पुढाकार घेऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचा पुतळा सन्मानाने त्याच ठिकाणी बसवावा असे आवाहन दशरथ मडावी संस्थापक,राष्ट्रीय अध्यक्ष, बिरसा क्रांती दल यांनी बिरसा व्हालिंटिअर फोर्सच्या प्रशिक्षण शिबीरात केले .स्थानिक यवतमाळ येथील सेंट्रल सेलिब्रेशन हॉलमध्ये रविवार दि. ११ जानवारीला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
नुकत्याच नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील सर्व आदिवासी नगराध्यक्ष तथा नगरसेवक यांचा जाहीर सत्कार संघटनेच्या वतीने प्रशिक्षण शिबिरात करण्यात आला .प्रशिक्षण शिबिराला विदर्भातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .यात बुलडाणा , अकोला, वाशिम, वर्धा, नागपूर, गडचिरोली ,चंद्रपूर ,यवतमाळ, अमरावती जिल्ह्यातील पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते .प्रशिक्षण शिबिरास प्रमुख उपस्थिती डी.बी.अंबुरे, अध्यक्ष, नारायण पिलवंड, राज्य प्रशिक्षक ,गिरीजाताई उईके, मारोती उईके, किरण कुमरे, उत्तमराव मोडक, संतोष ठाकरे, कार्तिका ठाकरे,रमेश भिसनकार, शरद चांदेकर, अखिल उईके यांची लाभली .शिबीराला विविध जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .यात विष्णुजी कोवे, पौर्णिमा ईस्टाम, विनोद भोकरे, हरिदास टेकाम,राजेश ससाने, पुष्पाताई ससाने, निर्मला करनाके, भारत मेश्राम, चंद्रप्रभा मेश्राम, जितेंद्र चांदेकर, धनराज कोवे, प्रतिमा आलाम,रेखा मेश्राम, नवनाथ पवार, अशोक अंभोरे, रामचंद्र लोखंडे, विश्वनाथ देवकर, डॉ. योगेश गिरे ,गणेश लठाड,गजानन पाखरे, उपस्थित होते .नवनियुक्त नगरसेवकांमध्ये यवतमाळ नगरपालिकेतील वैशाली उईके, मीना मसराम, सोनाली मडावी, पूजा गायकी ,आकाश परतेकी तर पांढरकवडा नगरपालिकेतील नगरसेवक कल्पना गेडाम, करिष्मा कुडमेथे व गणेश धुर्वे हजर होते .
प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वीतेसाठी मेजर जीवन कोवे, केशव बोरकर,रमेश मडावी, नागोराव गेडाम ,विजय काळे,रामेश्वर ढगे,पंडित घोटेकर,भागवत काळे,विष्णू लसंते, रोहिदास घोगेवाड, शंकर पखमोडे, रवी खाकरे, शारदा वानोळे ,लतिका पेंदोर आदिंनी परिश्रम घेतले. संचलन संजय मडावी यांनी तर आभार संघटनेचे क्रांतीगीत म्हणून मानले .








